वृक्ष गजानन पर्यावरण पूरक संकल्पना डॉ. सागर बालवडकर यांच्या माध्यमातून सुरू.

0
slider_4552

बालेवाडी :

श्रावण संपत आला की सगळ्यांना वेध लागतात ते गणरायाचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. गणरायाचे आगमन ते विसर्जन मोठ्या उत्साहात हे दिवस साजरे केले जातात. परंतू विसर्जनाच्या दिवशी सर्वांना भावनिक रुखरुख लागलेली असते. परंतु हाच गणपतीबाप्पा कायमस्वरूपी आपल्या सोबत राहिला तर.. होय ‘वृक्ष गजानन’ हि अनोखी पर्यावरण पूरक संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या माध्यमातून प्रा. रूपाली बालवडकर यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्व नागरिकांसाठी राबविली आहे.

‘वृक्ष गजानन’ या गणरायाच्या सुबक मूर्तीची माहिती देताना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, गणरायाचे आगमन हे आपण सर्वजण शुभ मानत असतो. गणेशोत्सव काळात घरातील तसेच सार्वजनिक वातावरण अतिशय आनंदी असते. सर्वांना हवाहवासा वाटणारा बाप्पाचा सहवास कायमस्वरूपी आपल्याला मिळावा म्हणूनच पर्यावरण पूरक ‘वृक्ष गजानन’ नागरिकांनी यावेळी आपल्या घरी आणावा त्याची मनोभावे पूजा करावी. याकरिता प्रभागातील सर्व नागरिकांसाठी ‘वृक्ष गजानन’ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. जेणेकरून ह्यावर्षीच्या गणेशोत्सव साजरा करताना तो पर्यावरणपूरक होईल. वर्षभर आपणास बाप्पाचा सहवास लाभेल. शेतातील १००% मातीचा वापर करून अतिशय सुबक अशी गणरायाची मूर्ती आहे. त्यांच्यासोबत एक सुंदर पाट आणि तुळशीच्या बिया दिल्या जात आहेत.

वृक्ष गजानन सुबक मूर्ती बालेवाडी येथे लक्ष्मी माता मंदिराजवळ डॉक्टर सागर बालवडकर जनसंपर्क कार्यालया मध्ये सर्व नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी ‘वृक्ष गजानन’ स्टॉल ची सुरुवात डॉ. सागर बालवडकर यांच्या हस्ते व प्रा. रूपाली बालवडकर यांच्या उपस्थित करण्यात आली.

 

 

See also  लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साईकृपा सोसायटी संघ विजयी