मॅक न्यूज चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा. मॅक न्यूज दिसणार आता ई पेपर स्वरूपात…

0
slider_4552

बाणेर : मॅक न्यूज

मॅक न्यूज तिसरा वर्धापन दिन आज बाणेर येथे साजरा करण्यात आला. यावेळी मॅक न्यूज आपले वेगळेपण जपत ई पेपर न्युज (बॅनर न्यूज) उद्घाटन करण्यात आले असून, काही महत्त्वाच्या बातम्या ई पेपर स्वरूपात वाचकांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मॅक न्यूज चे व्यवस्थापक महेश कचरे यांनी सांगितले.

या ई पेपर चे उद्घाटन बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे रमेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनाप्रसंगी ई पेपरची संकल्पना चांगली असून याद्वारे अधिक वाचक निर्माण होतील अशी माहिती उपस्थितांनी दिली.

मॅक न्यूज तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी न्यूज पोर्टल ला शुभेच्छा दिल्या. यावेळी योगीराज नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, मनसेचे दत्तात्रय रणदिवे, प्रकाशतात्या बालवडकर, नाना वाळके, निखिल धनकुडे, गणेश तापकीर, सीएफएम कंपनीचे मारुती कांबळे, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे रमेश रोकडे, इंद्रजीत कुलकर्णी, मोरेश्वर बालवडकर, अमेय जगताप, पर्शुराम तारे, डी.डी.सिंग, पत्रकार संघाचे पश्चिम विभाग अध्यक्ष बाबासाहेब तारे, कुणाल गोर्डे, प्रभातचे पत्रकार अभिराज भडकवाड, पुणे बुलेटिनचे केदार कदम, पुढारीचे पत्रकार मोहसीन शेख, अमोल टिळेकर, अनिल कडुसकर, संतोष भोसले, रोहित दळवी, पुनीत धवन, अश्विन कांबळे, पार्थ कचरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बालेवाडी वेल्फेअर असोसिएशन रमेश रोकडे यांनी सांगितले की, बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांचे अनेक कामे मार्गी लागतात. मॅक न्यूज वारंवार असोसिएशनच्या कार्यक्रमाच्या, समस्यांच्या बातम्या आपल्या माध्यमातून मांडले आहेत. यापुढे असेच सहकार्य मिळावे व ई पेपर माध्यमातून सुरू केलेलं बातम्यांचे माध्यम चांगले असल्याचे सांगितले.

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, ई पेपर स्वरूपात वाचकाला मिळणारे बातम्या निश्चितच आवडतील. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मॅक न्यूज बातम्या वाचल्या जातील व नागरिकांपर्यंत पोहोचतील.

See also  आयपीएस अधिकारी राजा माणगांवकर लिखित ‘सुसंवाद तनमनाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन