बाणेर :
भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा उत्तर कोथरूड मंडल कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. महिला मोर्चा उत्तर कोथरूड मंडल अध्यक्षा पदी अस्मिता कौस्तुभ करंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षातील उत्तर भागातील काम पाहता विविध महिलांना उत्तर मंडळ कार्यकारणी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.







अस्मिता कौस्तुभ करंदीकर यांना भारतीय जनता पार्टी, कोथरूड विधानसभा मतदार संघात, महिला मोर्चा अध्यक्षा उत्तर कोथरूड मंडल, म्हणून आमदार आणि उच्य तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन पाषाणकर, यांच्या उपस्थितीत, नियुक्ती पत्र देण्यात आले.

महिला मोर्चा कार्यकारिणीचे पदाधिकारी-
सर चिटणीस- वैशाली कमाजदार, स्नेहल सुतार
उपाध्यक्ष – स्नेहल चौगुले, वैदेही बापट, विजया चांदोरकर, वंदना सिंह, रिना रायकर, शुभांगी बोधनकर
सचिव – रंजना शितोळे कुलकर्णी
सोशल मीडिया प्रमुख- डाली दास
पक्षाने केलेली निवड व जबाबदारी लक्षात घेऊन इथून पुढे कार्य केले जाईल. तसेच कार्यकारणी निवड करण्यात आलेल्या महिलांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे अस्मिता करंदीकर यांनी सांगितले.








