औंध :
औंध-बाणेर-बालेवाडी-बोपोडी येथे स्थानिक व्यावसायिकांच्या महानगरपालिका परवानाधारक, हातगाडी, पथारीधारक बैठा परवाना आहे. यांच्याकडून पुणे महानगरपालिका जागेचे भाडे महिन्याला आकारले जाते. या भागात टेम्पोधारक हे फळ, भाजी, नारळ, खाद्य पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री केले जातात. तसेच बेकायदेशीर आठवडे बाजार यांच्यावरही कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने आरपीआयच्या वतीने औंध क्षेत्रीय कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आले.







याबरोबरच या परिसरात प्रत्येक बिल्डींगच्या, किराणा, मेडिकल दुकानाच्या फ्रंट व साईड मार्जिनच्याजागेत फळे, भाज्या बेकायदेशीरपणे विकतात. अशा बेकायदेशीर धंद्यांना पुणे महानगरपालिकेकडून बंद करण्यात यावे, अशी मागणी अनेकवेळा करून देखील आमच्या पत्राची अधिकाऱ्यांनी दखल न घेता औंध क्षेत्रिय कार्यायातील सहाय्यक आयुक्त गिरीष दापकेकर हे बेकादादेशीर धंद्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहेत. यामुळे हातगाडी, पथारीधारक यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे, अशी माहिती आंदोलना प्रसंगी आरपीआयचे नेते रमेश ठोसर यांनी दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व.रमेश ठोसर रि पा इं पुणे शहर नेते यांनी केले. यावेळी आंदोलनाला मागदर्शन अध्यक्ष शैलेद्र चव्हाण, माज अध्यक्ष महेद्र कांबळे, संजय कांबळे, यांनी केले . पुणे महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त वारुळे यांच्या कार्यालयाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निलेश ठोसर, योगेश भोसले, अजय निरवणे. पलवी मेघवत, शाकुंतला शेलार, सलीम शेख, हातगाडी व पथारी व्यावसायिक उपस्थित होते.
आंदोलनात प्रसंगी निवेदन देऊन करण्यात आलेल्या मागण्या खालील प्रमाणे : क्षेत्रीय कार्यालयाच्या भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर आठवडे बाजार बंद झाले पाहिजे. टेम्पोमध्ये फळ, भाजी, नारळ विक्री करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करण्यात यावी. ज्याचा फळभाजी व्यवसाय असेल त्याचे पुणे महानगरपालिककेडून सर्वेक्षण झाले आहे, अशा व्यवसासिकाचा परवाना मिळाला पाहिजे. कोरोना काळातील वाढीव बिले आलेली परवानाधारक हातगाडी पथारीधारक यांचे बिले कमीक करण्यात यावी.








