बाणेर :
नुकतीच बाणेर येथे झालेली भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ची विश्वस्त व पदाधिकारी निवड बेकायदेशीर रित्या करण्यात आले आहे. विश्वस्त व कार्यकारणी निवड करण्याआधी दोन महिने आधी निवड कार्यक्रम जाहीर करावा लागतो परंतु नवीन निवडीमध्ये कोणत्याही प्रकारे हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच बेकायदेशीर असल्यामुळे पुन्हा पहिल्यापासून ही निवड प्रक्रिया राबविण्यात यावी अशी माहिती पत्रकार परिषदेत भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट सचिव डॉ .दिलीप मुरकुटे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सदर पदाधिकारी व विश्वस्त निवड ही देवस्थान ट्रस्टच्या घटनेप्रमाणे करण्यात आलेली नाही. देवस्थान ट्रस्टच्या घटनेप्रमाणे प्रथम पोट नियम तयार करून अर्ज शुल्क भरून अर्ज घेणे व इतर बाबींचे पूर्तता करून घेण्यात आलेली नाही. सदस्य निवडीमध्ये सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात येते परंतु या नविन सदस्य व पदाधिकारी निवडी मध्ये कोणत्याही प्रकारे सर्वसाधारण सभा न घेता निवड करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे.
देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक बाबींसाठी तर गोष्टीचा बदल अर्ज करणे अनिवार्य असते परंतु नवे निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे बदल अर्ज देखील करण्यात आलेला नाही. तसेच जोपर्यंत पदांचा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडून येत नाही, तोपर्यंत कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी ट्रस्टचे बँक अकाउंट ही (गोठवण्यात) सील करण्यात आले असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
शंकरराव सायकर :
दिलीप मुरकुटे ज्ञानेश्वर तापकीर तसेच मी या भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी सर्वस्व अर्पण केलेले आहे. यासाठी मला माझी नोकरी देखील गमवावी लागली आहे. परंतु तरीदेखील आम्ही ट्रस्ट भक्कमपणे उभी केले. काल आलेल्या पोरांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हा निवडणुकीचा बेकायदेशीर स्टंट केलेला आहे या निवडी विरोधात आम्ही न्यायालयात देखील दाद मागणार आहोत.
ज्ञानेश्वर तापकीर ( उपाध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ) :
ज्या माणसांनी आपले सर्वस्व पणाला लावून देवस्थान ट्रस्ट साठी काम केले त्याच माणसांना आज बेकायदेशीररित्या बाजूला करण्यात येत आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ची याआधीचे सर्व सदस्य व पदाधिकारी निवड ही बिनविरोध झालेली आहे. त्याच पद्धतीने यंदा देखील ही निवड बिनविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती. परंतु ज्या वेळेस ही निवड बिनविरोध होत नाही असे दिसून आले त्यावेळेस मी माझा राजीनामा दिला आहे.
नवे उपाध्यक्ष राहुल पारखे :
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदाची निवड व पदाधिकारी नेमणूके रितसर ट्रस्टच्या घटनेनुसार नियमाला धरून झाली आहे. आमचे काही विश्वस्त पद न मिळाल्यामुळे नाराज जरी असले तरी ते आमचेच सहकारी आहेत. कालांतराने त्यांचा राग शांत झाल्यावर ते आमच्या सोबत श्री भैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार साठी एकत्र येतील याचा आम्हाला विश्वास व खात्री आहे. समस्त ग्रामस्थांना विश्वासात व सोबत घेऊनच भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार करणे व पारंपरिक देवाचे सर्व उत्सव ग्रामस्थांना बरोबर घेऊन करणे हेच आमचे ध्येय आहे.