पुणे:
शाळेतील दिवस हेच आपल्या जीवनात संस्काराचा पाया रचतात असे प्रतिपादन धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. आपल्या शाळेतील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आमदार कैलास पाटील हे मॉडर्न हायस्कूल पुणे- 5 चे माजी विद्यार्थी आहेत.
भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी. भारत आता विश्वगुरूची भूमिका बजावणार आहे. यात विद्यार्थीच भारताचे नेतृत्व करणार आहेत. असे विचार डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र आचार्य यांनी मांडले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारी शाळाच असते. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे. तसेच प्रभू श्रीरामांचा आदर्श अनुसरावा असे सांगितले.
कला, क्रीडा, शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व शिक्षकांना कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, दीपक मराठे, प्रशालेचे व्हिजिटर उद्धव खरे उपस्थित होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका वंदना सोनोने यांनी सूत्रसंचालन केले.पाहुण्यांचा परिचय मिलिंद कुलकर्णी यांनी केला .तर यादिवचन ईशानी डेरे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत आरकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.