हडपसर ते हिंजवडी व निगडी ते हिंजवडी ई-बस सेवा सुरू करण्याचा पीएमपीएल चा निर्णय.

0
slider_4552

हिंजवडी प्रतिनिधी :

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPL)ने हडपसर ते हिंजवडी फेज ३ निगडी ते वाघोली आणि निगडी ते हिंजवडी फेज ३ या मार्गावरच्या ई बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच 11 मार्गावर ई बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस सेवा 25 डिसेंबर पासून पासून पासून पासून सुरू होणार आहे.

पुणे शहरात प्रथमच ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या अकरा मार्गावर या बसेस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांचा वेळ कमी करण्यासाठी नियोजित ठिकाणी बस वेळेवर पोहोचावी यासाठी या बसला मार्गावरील ठराविक थांबे देण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना वेळेत पोचण्या निश्चित मदत होईल.

हडपसर ते हिंजवडी मान फेज ३

महत्वाचे बस थांबे : भेकराईनगर नगर, हडपसर गाडीतळ, फातिमानगर, एमजी स्टँड, पुणे स्टेशन, पीएमसी, सिमला ऑफिस, पुणे युनिव्हर्सिटी, बाणेर फाटा, बालेवाडी स्टेडियम, वाकड ब्रिज, हिंजवडी शिवाजी चौक, फेज १, विप्रो सर्कल, टेक महिंद्रा, फेज ३

निगडी ते वाघोली

महत्वाचे बस थांबे थांबे : निगडी भक्ती शक्ती, पवळे पूल, अकुर्डी चौक, पिंपरी स्टेशन, पिंपरी, कासरवाडी, बोपोडी, खडकी बाजार, डेक्कन कॉलेज, येरवडा, विमान नगर कॉर्नर, खराडी बायपास, साई सत्यम सोसायटी, वाघोली, केसनंद फाटा.

See also  हडपसर येथे कचरा प्रकल्पाला भीषण आग.