बाणेर :
बाणेर येथे कलमाडी स्कूल जवळील दुर्गा कॅफेजवळ बंदुकीने गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला असून गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.







बाणेर येथे राहणारा आकाश जाधव या तरुणावर त्याच्या परिचित असलेल्या अनिल ढमाले याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आपण जवळच्या हॉटेल मध्ये कॉफी प्यायला जाऊ असं सांगून, स्वतः बरोबर कॉफी प्यायला घेऊन गेले. गाडीवरून उतरता क्षणीच लगेच ढमाले याने जाधव यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला.
या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आकाश जाधव याला जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन ते अत्यावस्त आहेत. तर आरोपीने तिकडून पळ काढून औंध येथे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्यातरी आर्थिक वादातून हा प्रकार घडले असल्याचे चर्चा सुरू असून चतुर्श्रुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.








