पुणे :
कलागुणांचा संगम – आशयघन
गणेशखिंड येथिल मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आशयधन हा कार्यक्रम महाविद्यालयात सादर करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कलागुण सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.







यावर्षी विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक देखिल सहभागी झाले होते. नृत्य , नाट्यगीत , कविता , उखाणे हिंदी कविता , आदि सादर करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये जयोस्तुते हे गीत प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी सादर केले. गणेशवंदना ही डॉ. मुकुला कुलकर्णी यांनी दिली. प्रा . शिवानी वारे , डॉ. संगिता ढमढेरे, डॉ मंजुषा कुलकर्णी, प्रा सुवर्ण म्हसेकर , डॉ . सतिश अंबिके, डॉ . दीपरत्न खंदारे, व डॉ . रविंद्र क्षिरसागर विद्यार्थ्यांमध्ये ऋतुज चांदेकर यांनी गीत सादर केले . तसेच नाट्यगीत हे प्रा. सायली वळसंगीकर व डॉ . वर्षा जोशी यांनी सादर केले. हिंदी कविता ही प्रा . शिवागी नाईक तर अभंग हा सतीश दोडके यांनी सादर केला.
शास्त्रीय नृत्य हे प्रा . रुपाली शिंदे तसेच डॉ .पल्लवी निखारे(घुमत) व प्रा अपर्णा साठे, प्रा. सोनाली पठाडे यांनी मिस्टिकल डान्स सादर केला . प्रा. महेद्र वाघमारे बुलबुल तरंग, तर डान्सिंग दिवा कॉमर्स स्टॉफ यांनी प्रस्तृत केले. उखाणे डॉ . मनिषा बेले यांनी म्हणाले तर समर्पक फिशपाँड डाॅ. ज्योती गगनग्रास व डाॅ.वर्षा जोशी यांनी दिले.
कार्यक्रमाचे समन्वय डॉ .वर्षा जोशी यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मंजुषा कुलकर्णी व प्रा. शिवानी नाईक यांनी केले .







