रावेत येथे राडे रोड मध्ये जिवंत देशी झाड खुलेआम पणे गाडून टाकण्याचा प्रकार…

0
slider_4552

रावेत :

पिंपरी चिंचवड महानगर पालिका रावेत मध्ये ४०-५० फूट उंच जिवंत अशी देशी झाड खुलेआम पणे गाडून सिमेंट च्या राडारोड्याचा डोंगर या ठिकाणी पहावयास मिळत आहे. सिमेंटच्या आराड्या रोड मध्ये ही झाडे गाढून टाकण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या दिशाहीन व बिल्डर धार्जिण्या कारभाराचा उत्तुंग नमुना आज आपल्याला रावेत मध्ये पाहायला मिळतोय. बिल्डर लॉबी च्या राडारोड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेने रावेत मधील भोंडवे बाग समोर बांधकामाचा राडारोडा टाकण्यासाठी जागा दिली. यामध्ये बिल्डरांची तर सोया झाली पण आज सदर सिमेंटचे डोंगर ३ ते ४ माजली उंच झाले आहेत. यामध्ये उंच उंच अशी झाडे खुलेआम पणे जिवंत गाडली जात आहेत. परिसरातील नागरिकांच्या लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला आहे.

एकीकडे पर्यावरणाचा विषय ज्वलंत असताना, हवेची पातळी खालावत असताना महानगरपालिकेच्या आशीर्वादाने रावेत मधील जिवंत झाड महानगरपालिका गाडून टाकून क्रूर पणे Maharashtra State (Urban Area) Protection and Preservation of Trees Act, 1975. च उल्लंघन करत आहे. तरी संबंधीत लोकांवर लगाम टाकून महागरपालिकेने गाडलेल्या झाडांचा श्वासवास ताबडतोप खुला करावा अशी मागणी येथील रहिवासी अमोल कालेकर यांनी केली आहे.

See also  इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य शासनाने स्वीकारला