मॅक न्यूज ‘
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेतेमनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच आता ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध करत जो सगेसोयरेचा जीआर काढेल, त्यांचे आमदार पाडणार’ असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नाही म्हणून वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. काल रात्री ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीला विरोध करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगे सोयरेचा जीआर काढेल त्यांचे आमदार आम्ही चुन चुन के गिरांऐंगे असा थेट इशारा यावेळी प्रकाश शेंडगे यांनी दिला. राज्यभर ओबीसी उपोषणाचा वणवा पेटणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जबाबदारी सरकारची असेल असेही ते यावेळी म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे ओबीसींवर जोअन्याय होतोय त्याविरोधात हे उपोषण सुरू आहे. ते उपोषण करु शकतात तर आम्हीही उपोषण करु शकतो. राज्यभरात अशी उपोषणे सुरू होतील. आत्तापर्यंत सरकारने या उपोषणाची का दखल घेतली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.