अल्पवयीन आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली

0
slider_4552

पुणे :

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. आरोपीला जामीन मिळावा यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या मुलाला बाल सुधारगृहामध्येच राहावे लागणार आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे आई-वडील हे देखील तुरुंगात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या जामीनासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. आरोपी मुलाला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. आरोपी मुलाच्या काकूने ही याचिका दाखल केली होती. बाल अधिनियम कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी केला होता. पण त्यांनी दाखल केलेली ही याचिका हायकोर्टाने फेटाळली त्यामुळे आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.

See also  प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार...