हरित बालेवाडी” करण्याचा फेडरेशचा प्रयत्न…

0
slider_4552

बालेवाडी :

२०२१ पासून म्हणजे स्थापनेपासून बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन दरवर्षी पावसाळ्यात बालेवाडीत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवित आहे. मैदाने, रस्त्याच्या कडेला व अमेनिटी स्पेस जेथे शक्य आहे तेथे झाडे लावून पुन्हा एकदा “हरित बालेवाडी” करण्याचा प्रयत्न फेडरेशन सातत्याने करत आहे.

पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जातो. आतापर्यंत १२०० झाडं लावली गेली त्यापैकी ८५० ते ९०० झाडे जगली आहेत. जून २०२५ मध्ये पलक मार्ग परिसरात ५० झाडे लावून यावर्षीचा शुभारंभ करण्यात आला.

१० ऑगस्ट रोजी दसरा चौक ते लक्ष्मी माता मंदिर रस्यावर ५० झाडं लावली गेली. या कार्यक्रमाला फेडरेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, दफेदार सिंह, ॲड. इंद्रजित कुलकर्णी, राजीव शहा, वैभव आढाव, अशोक नवाल, रमेश रोकडे, ॲड. माशाळकर, वंदना चौधरी, सुनिल होवाळे, ललित पवार, डॉ. अजित धात्रक, गिरीश ढोबे,ओमप्रकाश वानखेडे आणि शकिल सलाटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

See also  अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या कोथरूड नाट्यमहोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद…!