गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या 

0
slider_4552

पुणे :

मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ घडलेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात जुन्या वादातून इसम नामे साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मोजेश शेखापुरे या तरुणावर जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या घटनेबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नं. 31/2026 भा.न्या.सं. कलम 109, 189, 352 तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 37 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने खंडणीविरोधी पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलीस हवालदार दयानंद तेलंगे व पोलीस हवलदार चव्हाण यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, सदर दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी विसरच्या मागील बाजूस लपून बसले आहेत. तसेच त्यांच्या जवळ गोळीबारात वापरलेले पिस्तूल असून ते पोलिस पथकावर गोळीबार करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसरात चारही बाजूंनी घेरून छापा टाकण्यात आला. त्यामध्ये पोलीस हवालदार दयानंद तेलंगे, पोलीस अमलदार मयूर भोक्रे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख हे अंमलदार सहभागी झाले.

पोलिसांनी अचानक झडप घालून दोन्ही आरोपींना कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली सुजुकी बर्गमन मोटारसायकल शोधून जप्त करण्यात आली आहे.

आरोपींकडे केलेल्या चौकशीतून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत कायगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व अंमलदार पोलीस हवालदार दयानंद तेलंगे, पोलीस अमलदार मयूर भोक्रे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी केली आहे.

See also  पुणे गणेशोत्सव 2023 : पुण्यात गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मानाचे गणपती झाले विराजमान