बाणेर :
पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रो व दुमजली उड्डाण पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने बाणेर व पाषाण रोडवरील एकेरी वाहतुक ही पुर्ववत दुहेरी वाहतुक करण्यात आली आहे..







चतु:शंगी वाहतुक विभागाचे अंतर्गत पुणे विद्चयापीठ चौक येथे मेट्रो तसेच दूमजली उड्चाणपुलाचे कामासाठी पाषाण रोड, बाणेर रोड व अभिमान श्री सोसायटी दरम्यानच्या मार्गावर एकेरी वाहतुककरण्यात आली होती. मेट्रो व दुमजली उड्डाण पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने एकेरी वाहतुक ही पुर्ववत दुहेरीवाहतुक करणे गरजेचे आहे . त्यामुळे येथील वाहतूक पुन्हा एकदा दुहेरी करण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यास सोपे व सुरळीत होणार आहे.
सदर भागातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्या करीता हिंमत जाधव पोलीस उप-आयुक्त, वाहतूक पुणे शहर चतु: शंगी वाहतूक विभागातील खालील नमुद रस्त्यावर खालील प्रमाणे आदेश निरगमित करीत आहे.
चर:शुंगी वाहतुक विभाग पुणे अंतर्गत पाषाण रोड, बाणेर रोड व अभिमान श्री सोसायटी रोड वरील एकेरी वाहतुक ही दि. ८/२/२६ पासून दुहेरी वाहतुक करएण्यात येत आहे. ही दुहेरी होणारी वाहतूक खालील प्रमाणे…
> पुणे विद्यापीठ चौक ते अभिमान श्री बाणेर मार्गावरील वाहतुक दुहेरी वाहतुक करण्यात येत आहे.
> पाषाण कडन येणारी अनिमान श्री पाषाण ते पुणे विद्यापीठ चौक दरम्यानचा मार्ग हा द्हेरी वाहतक करण्यात येत आहे. (पाषाण रोडने पुणे विद्यापीट चौकात येणा-या वाहनांनी डावीकडे बाणेर रोडला यु टर्न घेवुन पुणे ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप येथुन उजवी कडे यु टर्न घेयुन पुणे विद्यापीठ चौकाकडे याव)
》 अभिमान श्री पाषाण ते अभिमान श्री बाणेर मार्ग हा दुहेरी वाहतुक करण्यात येत आहे .( पाषाण कडून येवुन अभिमान श्री बाणेर मार्गे सकाळनगर / विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमान श्री बाणेर चौकातुन डावीकडे वळून २५० मीटर सिंघ सोसायटी समोरुन य टर्न घेवुन इच्छित स्थळी जावे.)
बाणेर फाट्याकडुन येणा-या व अभिमान श्री पाषाणकडे जाणा-या वाहनांनी अभिमान श्री बाणेर चौकाचे पुढे १५० मीटर सकाळनगर जवळून यु टर्न घेवुन इच्छित स्थळी जावे.








