पुणे :
आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात भव्य ‘तिरंगा रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. हे बदल मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत परिस्थितीनुसार लागू राहतील, अशी माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.







असा असेल तिरंगा रॅलीचा मार्ग
तिरंगा रॅलीची सुरुवात ललित महल हॉटेल चौकातून होणार आहे. त्यानंतर रॅली ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक आणि गुडलक चौक मार्गे पुढे जाऊन गरवारे चौकात समाप्त होईल.
रॅली सुरू असताना या मार्गावर सामान्य वाहनांची वाहतूक आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाणार असून, काही ठिकाणी पूर्णपणे पर्यायी मार्गांकडे वळविण्यात येणार आहे.
खंडोजीबाबा चौक ते गरवारे चौक मार्गासाठी पर्यायी रस्ते : या मार्गावरील वाहतूक बंद अथवा नियंत्रित असल्यास वाहनचालकांना खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येईल.
स्वारगेटहून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्यांसाठी : अलका चौक – खंडोजीबाबा चौक वीर सावरकर चौक → अण्णाभाऊ साठे चौक ना. सी. फडके चौक + मंगिरबाबा चौक + सेनादत्त चौक बालशिवाजी + म्हात्रे पूल + नळ स्टॉप + लॉ कॉलेज रोड.
स्वारगेटहून खडकी अथवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्यांसाठी : अण्णाभाऊ साठे चौक पूरम चौक बाजीराव रोड + गाडगीळ पुतळा + कुंभार वेस आरटीओ चौक.
खंडोजीबाबा चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी : नळ स्टॉप + पौड फाटा आठवले चौक लॉ कॉलेज रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.
तसेच अलका टॉकीज चौक केळकर रस्ता नदीपात्र → शनिवारवाडा + गाडगीळ पुतळा हा मार्गही वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.
सेनादत्त चौकातून येणाऱ्या वाहनांना बालशिवाजी → म्हात्रे पूल मार्गाचा वापर करता येईल.
शामराव गांजवे चौकातून येणाऱ्या वाहनांना पत्रकार भवन + एस. एम. जोशी पूल गरवारे कॉलेज या मार्गाने जाता येईल.
सेवासदन चौकातून येणाऱ्या वाहनांनी आप्पा बळवंत चौक + शनिवारवाडा + गाडगीळ पुतळा कुंभार वेस + आरटीओ चौक या मार्गाचा वापर करावा.








