बाणेर येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल ची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी; प्रगती स्वामीला कांस्यपदक…

0
slider_4552

बाणेर :

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या 5th Junior Federation National Championships 2026 या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या प्रगती स्वामी हिने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर कांस्यपदकाची कमाई केली आहे. या दैदिप्यमान यशासह प्रगतीने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या क्रीडा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

बाणेर येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या प्रगतीने ज्युनियर ४४ किलोखालील वजन गटात हे यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान तिने अत्यंत आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण खेळ करत गुजरात आणि उत्तराखंडच्या मातब्बर खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. आपल्या गटात संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावण्यासोबतच, प्रगती ही महाराष्ट्रातील ज्युनियर ४४ किलोखालील गटात क्रमांक १ ची खेळाडू ठरली आहे.

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल नाना धनकुडे, सचिव विराज धनकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुषमा भोसले तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या कोमल शिंदे यांनी तिचे विशेष कौतुक केले. आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रगतीचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिला पुढील उज्ज्वल क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  अमर टेक पार्क बालेवाडी येथे विजेचा करंट लागून महिलेच्या झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी..