ब्रेकिंग न्युज : सातारा बसस्थानकातील पाच शिवशाही बसला आग

0
slider_4552

सातारा :

सातारा बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या पाच शिवशाही बसना आज अचानक आग लागल्याने परिसरात मोठा आगडोंब पहायला मिळाला. या घटनेने सातारा शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असून अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

या दु्र्घटनेनंतर एसटी स्टॅण्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग कशामुळे लागली? याबाबतचा तपास आगार प्रमुखांसह पोलिस कर्मचारी करत आहेत.

See also  राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण आदित्य ठाकरे यांनी केले जाहीर