बालेवाडी :
सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यवसायिक क्षेत्रात काम करत असताना डाॅ.सत्यवान विलास बालवडकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळाली. अतिशय जिद्दीने व चिकाटीने या कबड्डी खेळाडू ने स्वतःची कबड्डी खेळातील आवड जोपासत, “प्रो कबड्डी लीग मधील सामन्यात खेळाडूंकडून आक्रमणा दरम्यान व संरक्षणा दरम्यान वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन मधील पीएचडी मिळवली.
मातीतला खेळाडू खेळात बदल घडविण्यासाठी बारकाईने अभ्यास करून पीएचडी मिळवली हे विशेष आहे.शिवाय सद्या त्यांनी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे प्राईम रोज इंग्लिश मीडियम स्कूल चालवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळेल यामुळे स्थानिक लोक देखील आनंदी आहेत.
मॅक न्यूज शी बोलताना डॉ. सत्यवान यांनी सांगितले की, पीएचडी चा खडतर अभ्यास करताना घरातील लोकांचे व मित्रांचे मजबूत पाठबळ मिळाले. तसेच अभ्यास करतांना शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाॅ. दिपक माने आणि गाईड म्हणून डाॅ.एम.आर.गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच डीपार्टमेंटच्या सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाले.
डॉ. सत्यवान बालवडकर यांनी अथक परिश्रमातून पीएचडी मिळवल्याची दखल घेऊन भाजप युवा नेते लहू बालवडकर व सोशल वेलअर च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बालेवाडी गावातील मिञ मंडळीनी देखील अभिनंदन केले. परिसरातील लोकांकडून कौतुक होत आहे.