देशाच्या विकासाच्या दृष्टीने नॅचरल गॅसचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक : राजेश पांडे

0
slider_4552

औंध :

देशाच्या विकासाच्या दृष्टीने नॅचरल गॅसचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. नॅचरल गॅस एम एन जि एल तर्फे आपल्याला पुरवला जात असून हा स्वस्त व सुरक्षित आहे. हा गॅस आपण वापरल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर भर पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सोसायट्यांनी या गॅस चा वापर करावा अशी माहिती भाजप सरचिटणीस व एम एन जि एल संचालक राजेश पांडे यांनी सांगितले.

औंध येथील क्लारिऑन पार्क सोसायटीमध्ये एम एन जि एल च्या गॅस पाईपलाईन च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, सोसायटीचे चेअरमन जाधव, गणेश नाईकरे, मयूर मुंडे आदी उपस्थित होते.

आगामी काही महिन्यामध्ये वर्षांमध्ये सर्व प्रभागातील सोसायट्यांमध्ये एम एन जी एल गॅस पुरवण्याचा उद्देश आहे. या गॅस बाबत चिंता करण्याची काही आवश्यकता नाही हा खूप सुरक्षित व नैसर्गिक गॅस आहे. हा गॅस पाईपलाईन द्वारे दिला जात असल्याने आता सिलेंडर ची वाट बघा, सिलेंडर एजन्सी ला फोन करा, नंबर लावा या सर्व मनस्ताप पासून तुमची सुटका होणार आहे, असे मत जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

नगरसेविका अर्चना मुसळे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, स्मार्ट सिटी अंतर्गत औंध प्रभागांमध्ये अनेक कामे झाली आहेत. या कामाचे नाव देशभरा बरोबरच जगभर झाले आहे. विदेशातही औंध स्मार्ट सिटी मधून बनवण्यात आलेले रस्त्याची माहिती मागवली जाते. ही खूप अभिमानाची बाब आहे.

See also  नववर्षाच्या पूर्वसंध्येला औंध येथे 'दारू नको दूध प्या' अभिनव उपक्रम.