निरंकारी बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाषाण बाणेर लिंक रोड या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान !

0
slider_4552

पाषाण :

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आज निरंकारी बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाषाण बाणेर लिंक रोड या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.स्वच्छतेचे महत्‍व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्‍याप्रमाणे मानवी जीवनात अन्‍न, वस्‍त्र, निवारा गरजेचा आहे. तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्‍व दिले गेले पाहीजे. कारण अस्वच्छता साथीच्‍या रोगांना आमंत्रण देते. आपल्या रोजच्या सवयीमध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. म्हणुन हा उपक्रम राबविला गेला.

यावेळी स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर,निरंकारी फाउंडेशनचे गुरू बोगाटीजी तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी, विजयजी कुलकर्णी, सुतारमामा, सुमीत सोनार उपस्थित होते.

यावेळी स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांनी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कामाचा गौरव करुन त्यांचे ॠण व्यक्त केले. त्यांनी मॅकन्यूज शी बोलताना सांगितले की, सर्वांनी स्वच्छतेचे महत्व जाणले पाहिजे. स्वच्छता राखणे समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. तसेच पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे.

See also  राम नदीमध्ये राडारोडा टाकून अतिक्रमण....