पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात आणि ऐकत कोणाचेच नाहीत : नाना पटोले

0
slider_4552

मुंबई :

नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. आज मुंबईत धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये देखील त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात आणि ऐकत कोणाचेच नाहीत, ऐकताच फक्त नागपूरचे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. तसेच, ‘मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत,’ असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

भाजपाने धनगर समाजाला फसवले !

धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष राज्यात सत्ता भोगली पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

See also  महापालिका निवडणुका मार्चमध्ये घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू...!