कर्नाटक येथे अपघातात जखमी गुणवान खेळाडूंना दया मदतीचा हात : माजी खेळाडूंचे आव्हान 

0
slider_4552

सुसगाव :

दि.17/03/2021 रोजी कर्नाटक (कलोर)येथे झालेल्या भीषण अपघातात महाराणा कबड्डी संघ कळंब या संघातील दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे व इतर खेळाडू गंभीर जखमी आहेत. सदर खेळाडू गरीब कुटुंबातील आहेत. यांच्यावर बंजारा हॉस्पिटल विजापूर या ठिकाणी उपचार सुरू आहे.

यांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त पैशाची गरज आहे तरी सर्वांनी खिळाडूवृत्ती दाखवून खेळाडूंच्या उपचारासाठी मदत करावी हि नम्र विनंती करण्यात आली होती. त्याला त्वरित प्रतिसाद देत सुसगाव येतील न्यू सम्राट स्पोर्ट्स क्लब चे माजी कबड्डी खेळाडू व ग्रामपंचायत सदस्य पै. अमोल दादा चांदेरे यांनी तत्काळ सदर खेळाडूंच्या उपचार साठी 5000 रू ची आर्थिक मदत पाटवली.

अमोल चांदेरे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, अशा दुःख द प्रसंगी आपल्या खेळाडूंना मदतीची गरज आहे. तेंव्हा ज्यांना जमेल त्यानी मदत करावी. खेळाडू हे गरीब असुन त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने सर्वांनी जमेल तशी मदत खालील नंबर वर पाठवावी अशी नम्र विनंती.

फोन पे / गूगल पे नंबर

सुलतान डांगे – 9766531430

See also  खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी मध्ये पीठ गिरणी वाटप- तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश पाडाळे यांचा उपक्रम