६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड.

0
slider_4552

मुंबई :

कोरोनाच्या संकाटानंतर आता भारतातील क्रीडाक्षेत्रही हळुहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक क्रीडा स्पर्धा भारतात सुरु झाल्या आहेत. आता ६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेलाही पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बारामती येथे महाराष्ट्राच्या संभाव्य संघाचे सराव शिबिर झाले होते. या सराव शिबिरातून १५ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.

खेल कबड्डीने दिलेल्या वृत्तानुसार ६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा आयोध्या, उत्तर प्रदेश येथे १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२१ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरासाठी अनेक खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती.

त्यातील २५ खेळाडूंची निवड झाली होती. आता यातील १५ जणांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. यानंतर निवड झालेल्या १५ जणांमधून १२ जणांची अंतिम निवड केली जाईल.

या संघाचे कर्णधारपद शुभम शिंदेला देण्यात आले असून पंकज मोहितेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

महाराष्ट्र कबड्डी संघ –

१. शुभम शिंदे (कर्णधार)

२. पंकज मोहिते

३. विकास काळे

४. सिद्धार्थ देसाई

५. संकेत सावंत

६. गिरीश एर्नाक

७. रिशांक देवाडिगा

८. अजिंक्य पवार

९. मयुर कदम

१०. दादासाहेब आव्हाड

११. निलेश साळुंके

१२. सुशांत सेल

१३. सुनील दुबिले

१४. ऋतुराज कोरावी

१५. सुधाकर कदम

See also  मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर कसोटीवर भारताची पकड