विना परवाना गावठी पिस्तल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले : सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई !

0
slider_4552

पिंपळे सौदागर : :

दिनांक १४/०४/२०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सांगवी पोलीस ठाणे हद्दीत स.पो.नि. सतिश कांबळे, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक भोजने, पोलीस नाईक केंगले, पोलीस नाईक देवकांत असे सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना ५:३० वा. चे सुमारास पोलीस हवालदार  चंद्रकांत भिसे व पोलीस नाईक  देवकांत यांना त्यांच्या बातमीदाराकंडुन स्वराज गार्डन हॉटेलजवळ, स्वराज गार्डन चौक, पिंपळे सौदागर, पुणे. याठिकाणी पांढरा रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम गावठी कट्टा घेवुन येणार असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली.

लागलीच सदर बातमी स.पो.नि. सतिश कांबळे यांना कळविले असता, स.पो.नि. सतिश कांबळे यांनी सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, सांगवी पोलीस ठाणे, पिं.चिं. यांना दिल्याने त्यांनी सदर बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स.पो.नि. सतिश कांबळे, पोलीस हवालदार  चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक भोजने, पोलीस नाईक केंगले, पोलीस नाईक  देवकांत व दोन पंच यांच्यासमवेत खाजगी वाहनाने स्वराज गार्डन हॉटेलजवळ, स्वराज गार्डन चौक, पिंपळे सौदागर, पुणे. येथे जावुन बातमीप्रमाणे खात्री केली.

सायं. ५ : ४५ वा. चे सुमारास सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबलो असता ६ : २० वा. सुमारास वरील वर्णनाचा एक संशयित इसम दिसले. त्यावेळी त्यास पोलिसांचा संशय आल्याने तो पोलिसांना पाहुन पळुन जात असताना पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक देवकांत व पोलीस नाईक  भोजने यांनी शिताफीने पाठलाग करुन त्यास पकडले, असता दोन पंचासमक्ष सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कुंचप्पा तिपण्णा गुडुर, (वय ४२ वर्षे, धंदा मजुरी, रा. के/ऑफ उमेश बोडके, मु.पो. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे. मुळ रा. मु.पो. कामावरम, ता. मंत्रालय, जि. कर्नुल, राज्य आंध्रप्रदेश.)असे असल्याचे सांगितले.

 

त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता कुंचप्पा तिपण्णा गुडुर याचे ताब्यात कंबरेला शर्टाच्या आतील बाजुस एक गावठी पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिश्यात दोन काडतुस मिळुन आले. त्याच्याकडे सदर गावठी पिस्टल व काडतुसांबाबत विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवुन त्याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे त्याने विनापरवाना एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याची आमची खात्री झाली. म्हणुन दोन पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेवुन स.पो.नि. सतिश कांबळे यांनी दोन पंचासमक्ष जागीच सविस्तर पंचनामा केला.

See also  अजित पवार यांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्ट्स सायकल वाटप.

आरोपी नामे कुंचप्पा तिपण्णा गुडुर, वय ४२ वर्षे, धंदा मजुरी, रा. के/ऑफ उमेश बोडके, मु.पो. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे. मुळ रा. मु.पो. कामावरम, ता. मंत्रालय, जि. कर्नुल, राज्य आंध्रप्रदेश. याचे विरुध्द पोलीस नाईक शशिकांत देवकांत यांनी तक्रार दिल्याने सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १५७/२०२१ भा.ह.का. कलम ३(२५) सह महा. पो. अधि. कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक कारवाई करीत आहोत.

सदरची कामगिरी कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे. रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, पिं.चिं., आनंद भोईटे, पोलीस उपआयुक्त , परिमंडळ २, पिंपरी चिंचवड, पुणे. श्रीकांत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड, पुणे. रंगनाथ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे, पिं.चिं. अजय भोसले., पोलीस निरीक्षक (गुन्हे), सांगवी पोलीस ठाणे, पिं.चिं. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिश कांबळे, पो.हवा. चंद्रकांत भिसे, पो.ना. सुरेश भोजने, पो.ना. कैलास केंगले, पो.ना. रोहिदास बोहाडे, पो.ना. शशिकांत देवकांत, पो.ना. नितीन खोपकर, पो.ना. अरुण नरळे, पो.शि. विजय मोरे, पो.शि. हेमंतकुमार गुत्तीकोंडा, पो.शि. अनिल देवकर, पो.शि. शिमोन चांदेकर यांनी केली आहे.