बोपोडी:
कोरोना आपत्तीच्या काळात नागरिकांची होणारी गैरसोय,रुग्णालयांची अवस्था,बेड उपलब्धता या बाबतीत पुण्याच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती यांना बोलावून घेत बोपोडी येथील मनपा रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी पन्नास ऑक्सिजन बेड वाढवावेत तसेच झोपडपट्टयांच्या बाबतीत विलगिकरण कक्षात बेड वाढवावेत अशा सूचना उपमहापौर यांनी केल्या.
तसेच बांधकाम सुरु असलेल्या संजय गांधी रुग्णालयात विलगिकरण कक्ष करता येईल का याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संजय गांधी हॉस्पिटल याचे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आल्या वेळी रिपाईं नेते परशुराम वाडेकर,महापालिका सहाय्यक आयुक्त जयदीप पवार,आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती,बोपोडी मनापा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर वीर उपस्थित होते.
यावर दुपारी बैठक घेत संजय गांधी रुग्णालयात सोयी सुविधा लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याबाबत संबंधित खात्याच्या प्रमुखांना सूचना करण्यात आल्या. या बैठकीस उपमहापौर सुनिता वाडेकर,मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे,भवन विभागाचे लंके,विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदुल,आरोग्य अधिकारी अंजली साबने आदी उपस्थित होते.