टोकियो:
भारतीय महिला बॉक्सर पूजा राणी आता आपल्या देशासाठी पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. 75 किलो वजनाच्या बॉक्सिंग स्पर्धेत तिने अल्जेरियाच्या प्रतिस्पर्धी इचरक चाएबचा 5-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 30 वर्षीय पूजा राणीने संपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी वर्चस्व गाजवले. दोनवेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या पूजा राणीने प्रतिस्पर्धिकडून उजव्या हाताने होणाऱ्या सरळ मुक्क्यांचा मार चपळाईने चुकवत होती आणि जेव्हा चायबने आखाड्यात स्वतःचे संतुलन गमावले तत्क्षणी पूजा राणीने त्याचा फायदा उठविला.
सामन्याच्या तीनही राऊंड मध्ये राणीने चायबावर वर्चस्व राखले. चायबा देखील तिचा पहिला ऑलिम्पिक सामना खेळत होती. पण चायबाला आपले मुक्के योग्य ठिकाणी लावता आले नाहीत. प्रतिस्पर्धीपासून योग्य अंतर ठेवून राणीने हुशारीने सामना खेळाला. राणीने चायबावर वर्चस्व राखण्यात यश मिळवले. चायबानेही चढाओढ करून जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पूजाच्या मजबूत बचावामुळे वारोंवार मुक्क्यांचा निशाणा चुकत होता.
राणीचा आतापर्यंतचा प्रवास हा फार अडचणींनी भरलेला होता. तिला झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तिला संघर्ष करावा लागला, ज्यामुळे तिचे करियर संपण्याची भीती निर्माण झाली होती, आर्थिक अडचणी असूनही ती इथपर्यंत पोहोचली आहे. तीचे वडील एक पोलिस अधिकारी आहेत. बॉक्सिंग हा पुरुषांनी खेळायचा खेळ आहे असे पूजाच्या वडिलांना वाटत असल्याने तिला भीतीपोटी या खेळात सहभागी व्हायला देत नसे.
An arrival to remember 🔥🇮🇳💪#IND's @BoxerPooja had the judges unanimously declare her the winner in her VERY. FIRST. OLYMPIC. BOUT 🥊#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion pic.twitter.com/RoXVINKPcT
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 28, 2021