भारताच्या धारदार गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले

0
slider_4552

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये (बुधवार) पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात झाली. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या जिव्हारी लागला. इंग्लंड संघ तिसऱ्या सत्रापर्यंत फक्त 183 धावांवर आटोपला (England all out on183). जसप्रीत बुमराह व मोहम्मद शामी या भारताच्या धारदार गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले.

इंग्लंड तर्फे सर्वाधिक 64 धावा कर्णधार जो रूटने बनवल्या तर भारतातर्फे जसप्रीत बुमराह ने 46 धावा देत इंग्लंड 4 (4/46) फलंदाजांना तंबूत धाडले. सुरुवातीला पडझड झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाने 138 धावांमध्ये 3 गडी गमावून डाव सावरला. परंतु त्यानंतर इंग्लिश फलंदाज सपेशल गडगडले. बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद शमी 3 गडी शार्दुल ठाकूर 2 गडी तर मोहम्मद सिराज ने 1 गडी बाद केला.

भारताने पहिल्या इंग्लंडचे रोरी बर्ग्ज व क्रावली या 2 फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमीने डॉम सिंब्लेला बाद केले. त्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी सावध पवित्रा स्वीकारला. तरीही सत्राच्या शेवटी शामीने बेअरस्ट्रोला सुद्धा तंबूत धाडले. चहापानानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. व 183 धावांमध्ये इंग्लंडचे सर्व फलंदाज ठराविक अंतराने बाद गेले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने दिवसअखेर 13 षटकांत बिनबाद 21 धावा बनवल्या असून रोहित शर्मा व के एल राहुल प्रत्येकी नऊ धावांवर नाबाद राहिले.

https://twitter.com/ICC/status/1422974856602157058?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1422974856602157058%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  प्रो कबड्डी लीग चा आठवा हंगाम 22 डिसेंबरपासून, पहा कोण कोणत्या संघात