पीएमआरडी अधिकाऱ्यांसमोर सुस ग्रामस्थांनी मांडल्या आराखड्यातील हरकती..! 

0
slider_4552

सुस :

नुकताच पीएमआरडी ने पुणे जिल्ह्यातील त्यांच्या अधिकारातील गावांमधील प्रारूप आराखडा जाहीर केला, यामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस- म्हाळुंगे गावासह इतर २१ गावांचा देखील समावेश आहे . नागरीकांचा समन्वय साधण्यासाठी आराखड्यात दर्शविलेल्या आरक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन पीएमआरडी चे रचनाकार शामराव चव्हाण , नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक , प्लॅनर आकाश म्हेत्रे यांनी सुस ग्रामस्थांची भैरवनाथ मंदिरामध्ये ज्यांच्या जागेवर आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे अश्या नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी साहेबराव चांदेरे यांनी गोरगरीब नागरिकांच्या वतीने सर्व्हे नं . ६५ , ६३ , ५३ यामधून जाणारा १८ मीटरच्या रस्त्या ऐवजी १५ मीटर रस्ता आखण्यात यावा, यामुळे गोरगरीब नागरिकांची घरे वाचविण्यासाठी फार मोठी मदत होईल. त्याचप्रमाणे नंदू साळुंके यांनी सर्व्हे नं. १७९, १८८ रिंग रोड, डीपी रोड जुन्या आर पी प्रमाणे ठेवण्यात यावा अशी सूचना केली.

अमित भांगरे यांनी सुस गावातील गृह प्रकल्पाच्या नागरिकांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून सुस गावातून जाणारा ६० मीटर डीपी रोड वर पीएमआरडीने बांधकाम व्यवसायिकांना गृह प्रकल्प मंजूर केलेली आहेत, सदर जागेचा एफएसआय बांधकाम व्यवसायिकांनी वापरलेला आहे. परंतु पीएमआरडी ने प्रसिद्ध प्रारूप आराखड्यामध्ये सदरचा रस्ता ३० मीटरने दर्शविलेला आहे. त्यामुळे गृह प्रकल्पाच्या समोर जी जागा शिल्लक राहील ती जागा ती संबंधित गृह प्रकल्पाच्या नावाने व्हावी असे मत मांडले.

यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी असे सूचित केले की, समाविष्ट गावातील प्रतिनिधित्व १५ वर्षापासून करत असताना बाणेर- बालेवाडी या गावांचा सन १९९७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. परंतु तब्बल १३ वर्षांनी आमचा पार्ट डीपी मंजूर झाला. तदनंतर २ वर्षांनी आमच्या गावातील डीपीला मान्यता मिळाली. ही वेळ नवीन समाविष्ट गावांवर येऊ नये म्हणूनच राज्य सरकारच्या संमतीने पीएमआरडी ने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्याचे मी मनापासून स्वागत करतो.

पुढे बोलताना नगरसेवक चांदेरे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून देतो की, सुस व म्हाळुंगे या दोन गावातील सार्वजनिक हिताची उदा. स्मशानभूमी, पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या टाक्या, घनकचरा प्रकल्प, जल शुद्धीकरण केंद्र, मैला शुद्धीकरण केंद्र किंवा एसटीपी प्लॅन असे महत्त्वाचे आरक्षणे आपण पुणे महानगरपालिके मार्फत सर्व्हे करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमआरडी ला सूचना कराव्यात.

See also  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा संपन्न

यावेळी पीएमआरडी चे नगररचनाकार श्यामराव चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मला आज ही मिटिंग पाहून आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून समाधान वाटले. नागरिकांनी वैयक्तिक तक्रारी पेक्षा सार्वजनिक हिताच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर केल्या आणि यामध्ये नागरिकांनी सुचविलेल्या बहुतांशी कामामध्ये थोडाफार आदल – बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना त्यांनी आव्हान केले की दि. ३० ऑगस्ट पर्यंत आप – आपल्या सुचना – हरकती नोंदवाव्या. या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएमआरडी चे आयुक्त सुहास दिवसे सुचना केली की नागरिकांना सुचना – हरकती देण्याचा कालावधी खुप कमी आहे. त्यामुळे त्यांना कालावधी वाढविण्यात यावा. संबंधित मुदतवाढ मिळवण्यासाठी नगर विकास विभागाला कळविले आहे अशी माहिती शामराव चव्हाण यांनी दिली.

सदर बैठकीला पीएमआरडी चे नगर रचनाकार शामराव चव्हाण, नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक, प्लॅनर आकाश म्हेत्रे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुनील चांदेरे, रामदास ससार, सुहास भोते, नितीन चांदेरे, गोवर्धन बांदल, गणेश सुतार, गणपत चांदेरे, सचिन चांदेरे, दशरथ साळुंखे, पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, लक्ष्मण चांदेरे, युवराज चांदेरे, नामदेव चांदेरे, रोहिदास भोते, दत्तात्रय चांदेरे, सुखदेव चांदेरे, गोपीनाथ चांदेरे, कृष्णाजी चांदेरे, सोमनाथ चांदेरे, बाळासाहेब निकाळजे, संदीप राम चांदेरे, साहेबराव चांदेरे, अमित भांबरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.