बालेवाडी :
केंद्रामध्ये असणाऱ्या भाजप सरकारने दिवसेंदिवस वाढविलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने डॉ. सागर बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी येथील दसरा चौकातील रस्त्यावर चूल पेटवून त्यावर भात शिजवून जोरदार घोषणा देत गॅस दरवाढ निषेध आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणा देण्यात आल्या.







या वेळी बोलताना प्रा. रूपाली बालवडकर यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वाढतच चाललेली महागाई लक्षात घेता सर्व सामान्य नागरिकांनचा जीव मेटाकुटीला आला आहे. सर्व सामान्य माणसांना जगणे मुश्कील झाले आहे. विकासाचा मुद्दा बाजूला राहून सर्वसामान्यांना मूलभूत गरजांसाठी आंदोलने करण्याची वेळ आणून ठेवली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जीवन महाग करून ठेवले आहे. GDP वाढला म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल वाढले आहे. केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या जनतेला आधार देण्याची गरज असतांना उलट सतत महागाई वाढत आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मनमानी केलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
दोन वेळचे जेवण कसे करायचे पोठाची खळगी कशी भरायची असा प्रश्न सर्व सामान्यांनी या आंदोलनाच्या निमीत्ताने केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार ला केला.
या वेळी डॉ. सागर बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, नितिन कळमकर, राखी श्रीराव, प्राची सिद्दीकी, मीना विधाले, मयुरी इंगळे, ॲड. माशाळकर, गुरुदास बालवडकर, भाऊसाहेब बालवडकर, सोमनाथ बालवडकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.








