बाणेर नागरी पतसंस्था चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर नागरी पतसंस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पतसंस्थे मध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजित करण्यात आले होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पुढील काळात बाणेर गावचे मानबिंदू ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाकरिता एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मदत म्हणून देण्यात आली. सदर रक्कम स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष भाजप नेते प्रल्हाद सायकर यांना सोपविण्यात आली. तसेच संध्याकाळी विद्यांचल हायस्कूल बाणेर येते वर्धापन दिनानिमित्त हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरिकर यांचे प्रबोधनपर कीर्तन ठेवण्यात आले होते.

बाणेर नागरी पतसंस्था आहे विविध सामाजिक उपक्रमातून समाजाची सेवा करत यशस्वीपणे तेवीस वर्षे पूर्ण करून चोवीस वर्षात पदार्पण करत आहे. ही बाब निश्चितच आमच्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. असे मत बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. संस्थेच्या वाटचालीमध्ये संस्थेचे स्टाफ संचालक मंडळ यांचे तसेच संस्थेचे हितचिंतक मित्र मंडळ परिवार यांचेही फार मोठे योगदान आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, राम गायकवाड, स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर, राजेश विधाते, व्हाईस चेअरमन शशिकांत दर्शने, अभिनव शिक्षण संस्थेचे अशोक मुरकुटे, चेअरमन विजय विधाते, राजेंद्र मुरकुटे, ॲड. दिलीप शेलार, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. सुदाम मुरकुटे, रामदास विधाते, संजय ताम्हाणे, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

See also  पाषाण येथे संत नरहरीमहाराज सोनार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन