बाणेर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारतचे स्मार्टकार्ड भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी केले होते.







या प्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य माणसाची अडचण काय आहे, हे लक्षात घेऊन काम करतात. तसेच काम नगरसेविका ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांनी केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड नागरिकांना उपलब्ध करून खऱ्या अर्थाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम कळमकर दांपत्याने केले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर भाजपचे उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या सेवा हेच संघटन या मार्गाचा अवलंब करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणीच्या प्रसंगी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचा पिंड समाजसेवेसाठी आहे. समजासाठी आम्हीं सतत काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी उपस्थित कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रल्हाद सायकर, सहकारआघाडी प्रभारी प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, बबनराव चाकणकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, स्वरूपा शिर्के, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, मीना पारगावकर, उज्वला साबळे, रीना सोमय्या, संतोष तापकीर, गणेश चाकणकर, सुभाषभाऊ कळमकर, लखन कळमकर, अनिल कळमकर, रविंद्र कळमकर, सुधीर ताम्हाणे, संदीप वाडकर, राहुल पारखे, महादेव सायकर, निलेश गायकवाड, मल्हारी सायकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी केले.








