बालेवाडी :
पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे . असे ठणकावत मना मनात क्रांतीची ठिणगी पेटविणारे थोर साहित्य सम्राट, महान शाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०१ वी जयंती आहे . या जयंतीनिमित्त बालेवाडी येथे शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, पांडुरंग बालवडकर, कार्यक्रमाचे आयोजक महेश भांडे, राहुल रणवरे, सर्जेराव भांडे, विशाल आरसूळ, राजू कांबळे, बबन पाइकर, बाजीराव भांडे, दादा बालवडकर, संतोष भांडे ,सोमा भांडे, भीमराव भांडे आदी उपस्थित होते. यावेळी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी सांगितले की, अण्णा भाऊंची जयंती 1 ऑगस्ट 1920 तर 18 जुलै 1969 हा अण्णा भाऊ साठे यांचा स्मुर्तिदीन. या दिवशी देशभरातुन त्यांना अभिवादन केले जाते. मातंग परिवारात जन्मलेल्या अण्णा भाऊंची ओळख शाहिर, कष्टकरी कामगारांचा बुलंद आवाज, अण्णा भाऊंचे साहित्य हे वंचित शोषित घटकांचे जीवनाचे खरे स्वरूप प्रकट करून अन्यायाविरोधात लढण्याची ताकद देते.