शिवसेनेचे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरिबांना सरंजाम वाटप…!

0
slider_4552

बाणेर :

डॉ. दिलीप मुरकुटे यांच्यावतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावातील गोरगरीब नागरिकांनकरिता खास दिवाळीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर आणि सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते सरंजाम वाटप करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, शिवसैनिक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांनची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गोरगरिबांसाठी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.

यावेळी बोलताना आदित्य शिरोडकर यांनी सांगितले की, डॉ.दिलीप मुरकुटे यांच्या कडे कोणतेही पद नसले तरी शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे फार मोठे पद आहे. त्यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे निश्चितच लवकरच शिवसेनेच्या वतीने एक मानाचे स्थान त्यांना मिळेल.

यावेळी बोलताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी सांगितले की, दिलीप मुरकुटे यांचे कामाची वेगळी पद्धत आहे. ते शंभर टक्के समाजकारण करून काम करतात. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फार मोठे काम करत आहे. गोरगरीबांना आधार देत आहे. आणि त्यांची ताकद वाढविण्याचे काम शिवसैनिक म्हणून मुरकुटे यांच्या सारखे कार्यकर्ते करत आहे. शिवसैनिक ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या जोरावर बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागात शिवसेनेचा भगवा फडकला शिवाय राहणार नाही. त्याकरता सर्वतोपरी ताकद उभी करण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी संपर्क नेते सचिन अहिर, उप संपर्कनेते आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. दिलीप मुरकुटे , माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, संतोष तोंडे, ज्योती चांदेरे, नितीन चांदेरे, राजेश विधाते, संतोष मोहोळ, राम गायकवाड, सुनील कळमकर, शाम बालवडकर आदी उपस्थित होते.

See also  विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी - अनुराधा ओक