सोमेश्वरवाडी :
दिवाळीचे निमित्त साधून भाजप युवा नेते सचिन दळवी यांच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि परिसरातील महिला भगिनींच्या सोयीसाठी शेतकरी आठवडे बाजार उद्घाटन समारंभ संपन्न झाला. तसेच यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सदस्यपदी निवड झाल्याबद्दलनगरसेविका ज्योती कळमकर यांचा सर्व सोमेश्वरवाडी ग्रामस्थ आणि सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.




कार्यक्रमाची मॅकन्युज ला माहिती देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्या प्रति कृतज्ञता आणि प्रेम वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत बाल सवंगड्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्यांचा कौतुक सोहळा तसेच परिसरातील महिला भगिनींना घरगुती भाजीपाला आणण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून शेतकरी आठवडे बाजाराची सुरुवात करत आहे. आपल्या परिसरातील कार्यक्षम नगरसेविका ज्योती कळमकर यांची पीएमआरडीए सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी केला आहे.
यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, पोपटराव जाधव, खंडुशेट आरगडे, बारीकराव जोरे, श्याम काकडे, धनंजय बामगुडे, जगन्नाथ दळवी, भरत जोरे, उत्तम जाधव, संजय निम्हण, मोरेश्वर बालवडकर, विनायक काकडे आणि सर्व सोमेश्वरवाडी ग्रामस्थ व महिला मंडळी आदि मान्यवर उपस्थित होते.
किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये एकूण ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम चार क्रमांक करण्यात आले.
किल्ले बनविणे स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक (सन्मानचिन्ह + आकर्षक भेटवस्तू व रोख रक्कम रु ७७७७) : रोहित उणेचा
द्वितीय क्रमांक (सन्मानचिन्ह + आकर्षक भेटवस्तू व रोख रक्कम रु ५५५५) : सौरभ सुतार
तृतीय क्रमांक (सन्मानचिन्ह + आकर्षक भेटवस्तू व रोख रक्कम रु ३३३३) : आदित्य संदीप कोकाटे
चतुर्थ क्रमांक (सन्मानचिन्ह + आकर्षक भेटवस्तू व रोख रक्कम रु २२२२) : अर्णव सोमनाथ जाधव.
आयोजक सचिन दळवी मित्र परिवार









