बाणेर :
बालेवाडीफाटा ते हॉटेल सदानंद या रस्त्याच्या फूटपाथ चे काम सध्या स्मार्ट सिटी मार्फत चालू आहे .परंतु कामाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी आणि ठेकेदाराकडून योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता दोन्ही बाजूने खोदण्यात आला आहे व या रस्त्यावर वाहनांना सूचना करणारे फलक लावलेले नाहीत. त्यामळे सामान्य नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. एकूणच बाणेर – बालेवाडी येथे स्मार्ट सिटी चे ज्या ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या त्या ठिकाणी अशीच अवस्था आहे.
स्मार्ट सिटी ने अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाचा खेळ करू नये व चालू असलेली कामे त्वरित पूर्ण करावी आणि नागरिकांच्या सुरक्षितते संबंधी सर्व उपाय योजना कराव्यात. या मागण्या करण्यासाठी सायकर चौक, बाणेर येथे प्रभाग क्र. 9 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी जंगल रणावरे, अर्जुन ननावरे, समीर चांदेरे, नितीन कळमकर, विशाल विधाते, संजय ताम्हाणे, मनोज बालवडकर, राखी श्रीराव, डॉ. मीना विधाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.