बालेवाडी :
भारतीय जनता पार्टी पुणे शहर च्या वतीने बाणेर येथील बालेवाडी फाटा येथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम केंद्राचा निधी उपलब्ध होऊन देखील रखडलेले आहे. मेट्रोचे काम सुरु करावे, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबद्दल बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले की, केंद्र सरकारकडून बाराशे कोटीचा निधी उपलब्ध होऊन देखील राज्य सरकार चा उदासिनतेमुळे मेट्रोचे कामांमध्ये प्रगती दिसून येत नाही. मेट्रो साठी आवश्यक 98 टक्के जागा ताब्यात असून उर्वरित दोन टक्के जागा मिळण्यास देखील फारशी अडचण नाही, निधीची कमतरता नाही. तरीदेखील राज्यातील आघाडी सरकारला काम करण्याची इच्छा दिसत नाही. त्वरित आंदोलनाची दखल घेऊन जलद गतीने मेट्रोचे काम सुरू करावे अन्यथा बाणेर बालेवाडी बंद करून प्रत्येकाचे ऑफिसला घेराव घालून काम करण्यास मज्जाव घालू असा इशारा देत आहे.
यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने सुरू केलेले समाज उपयोगी प्रकल्प महा आघाडी सरकार थांबवायचं काम करत आहे. मेट्रोचा प्रकल्प आघाडी सरकारला मार्गी लावून द्यायचा नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आघाडी सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नाही. मेट्रोचे काम सुरू करावे अन्यथा जोरदार आंदोलन करत राहू.
खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुनीत जोशी, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेवक किरण दगडे, प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, सचिन दळवी, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, उमा गाडगीळ, शिवम बालवडकर, शिवम सुतार आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील सर्व भाजप पदाधिकारी आणि माझ्या प्रभाग क्रमांक 9 चे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांचे आभार सचिन पाषाणकर यांनी मानले.