कडकडीत थंडीतही शिवसैनिक बेमुदत ठिय्या आंदोलनावर ठाम. 

0
slider_4552

पाषाण :-

११ डिसेंबर २०२० पासुन सुरू असलेल बेमुदत ठिय्या आंदोलन कडाक्याच्या थंडीचा कायम सुरू ठेवले आहे. नविन कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणेशहर शिवसेनेच्या वतीने उपशहरसंघटक आशुतोष आमले साईचौक, सुसरोड,पाषाण येथे रस्त्यावर तंबु ठोकुन बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.

या कायद्यांचे सामान्य माणसाच्या जिवनमानावर होणारे दुष्परिणाम व भाजपची भांडवलदार धार्जिणी हुकूमशाही नितिमत्ता याबाबत लोकांचे प्रबोधन करत आहेत, या आंदोलनात शाखाप्रमुख सुनील राजगुरु, अजिंक्य सुतार, गणेश दळवी, भरत दहिभाते, विक्रांत भोसले, पवन खराबे, ऋषीकेश कुलकर्णी, शाम बालवडकर, मकरंद कळमकर, स्वप्निल चोभारकर, सामाजिक कार्यकर्ते कमलेश सुतार आदी सहभागी झाले आहेत.

शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव आढळरावपाटील तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अंकुशराव काकडे यांनी सोशल मिडियावरून पाठिंबा जाहिर करून कौतुक केले. शिव अंगणवाडी सेनेच्या महाराष्ट्रराज्याच्या अध्यक्ष सारिका सावंत व उपाध्यक्षा रंजना कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास भेट दीली यावेळी जिल्हा संघटिका कल्पना थोरवे, कस्तुरी पाटील ,सविता बलकवडे, सीमा शिंदे आदी उपस्थित होत्या.

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे व पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहरप्रमुख किरण साळी, युवासेना मावळ तालुकाप्रमुख अनिकेत घुले,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे शिवसेना महिलाआघाडी शहरप्रमुख सविता मते, शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका संगिता पवळे, मुळशीतील तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, कोथरूड मतदारसंघ समन्वयक राजाभाऊ कुलकर्णी, श्रीपाद चिकणे यांच्या सह शिवसैनिकांनी उपस्थीती लावली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर तसेच संपुर्ण महाविकास आघाडीचे घटक पक्ष या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र राज्य समाज एकिकरण संघाचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले या वेळी बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे उपस्थित होते, महाराष्ट्रभुषण शिवशाहीर बाळासाहेब काळजे यांनीही सदिच्छा भेट दिली. आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठाण व टायगर ग्रुप, विरशैव शिवा संघटना यांच्या वतीनेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

See also  शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांचे बाणेर येथे स्वागत : शिवसेनेच्या कामाचा घेतला आढावा!

भागातील अनेक मान्यवर नागरिकांची उपस्थितती असते दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद आहे. वाढत्या थंडीने काल पासुन आमले यांची प्रकृती बिघडली आहे. पंधरा दिवस उलटले असतानाही शिवसैनिक बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त वाढता प्रतिसाद आहे.