बालेवाडीतील गिनी विवा सोसायटीत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित वर्षाला वीस लाखाची बचत…

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी परिसरातील गिनी विवा सोसायटीने पर्यावरणपूरक उपक्रम राबवत 84.3 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पामुळे सोसायटीला दरवर्षी सुमारे 20 लाख रुपयांची आर्थिक बचत होणार असून, दीर्घकालीन दृष्टीने हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक अर्थसहाय्य सोसायटीच्या मुदत ठेवीवर (FD) आधारित ओव्हरड्राफ्टद्वारे उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची संकल्पना निश्चिती आणि अंमलबजावणी ‘सौर कोर समिती’ च्या माध्यमातून करण्यात आली. समितीत अध्यक्ष स्नेहलकुमार गुप्ता, सचिव पंकज थरेजा यांच्यासह रसिक वाघेला, बी. एस. वाकचौरे, सुधीर वरोडिया, मेहबूब मुल्ला आणि इतर सदस्यांचा सक्रिय सहभाग होता.

या सौर ऊर्जा प्रकल्प मुळे सोसायटीतील पाण्याच्या मोटारींसह, लिफ्ट व सर्व सामायिक क्षेत्रांच्या विजेच्या गरजा पूर्ण होत आहेत. त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे.

गिनी विवा सोसायटीने हाती घेतलेला हा ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ परिसरातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

 

See also  भाजपा प्रभाग क्रमांक ९ महिला पदाधिकारी व लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने नवरात्री निमित्त भोंडला व दांडिया महोत्सव उत्साहात साजरा.