शिवनेरी :
वसुंधरा अभियान तर्फे 2006 पासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तुकाई टेकडी बाणेर चालू आहे . वृक्ष संवर्धन बरोबरच आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छता मोहीम, देखील वसुंधरा तर्फे राबविण्यात येते.




वसुंधराच्या 78 सदस्यांमार्फत शिवनेरी येथे गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, गड स्वच्छते मोहिमेबरोबर शिवनेरीचा उज्ज्वल, दैदिप्यमान प्राचीन असा इतिहास ऐकण्याची संधी इतिहास तज्ञ विनायक खोत यांच्या माध्यमातून मिळाली. इतिहास ऐकता ऐकताच गड किल्ले स्वच्छता राखण्याचे पवित्र काम काम वसुंधरा सदस्यांनी केले. गडावर इतरत्र पडलेला प्लास्टिक, प्लास्टिकचा कचरा, प्लॅस्टिकच्या बॉटल्स वसुंधरा सदस्यांनी गोळा केल्या व सर्व कचरा पायथ्याशी आणला.
शिवनेरी किल्ल्याच्या समोरच असलेला देवगड डोंगर या ठिकाणी वनरक्षक रमेश खरमाळे यांच्या माध्यमातून हरित कार्य चालू आहे, त्या हरित कार्याला सहभाग म्हणून त्या ठिकाणी वसुंधरा अभियान तर्फे त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्याठिकाणी चालू असलेल्या हरित कार्याचे वसुंधरा माध्यमातून कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे तेथे असलेल्या amba-ambika लेणींना देखील भेटी देण्यात आली








