32 व्या किशोर/किशोरी गट जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर कबड्डी संघ, क्रीडा कला प्रकल्प संघाने मिळविले विजेतेपद

0
slider_4552

थेरगाव :

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने आणि कैलास बारणे युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या किशोर/किशोरी गट जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात वाघेश्वर कबड्डी संघाने तर मुलींच्या गटात क्रीडा कला प्रकल्प संघाने विजेतेपद पटकावले.

मुलांच्या गटात चऱ्होली च्या वाघेश्र्वर संघाने दोन्ही गावांमध्ये नियोजनबद्द खेळ करून चमकदार विजय मिळवला. विजेत्या संघाकडून पृथ्वीच्या तापकीर आणि आयुष कोतवाल यांनी सुरेख खेळ केला.

तर मुलींच्या गटांमध्ये क्रीडा कला विकास प्रकल्प संघाने जबरदस्त खेळ करून सासवडच्या नऊ तरुण संघाला दणदणीत विजय मिळवत हरविले. क्रीडा प्रकल्प संघाच्या कीर्ती कडची आणि सुजाता पवार यांच्या खेळीमुळे विजय मिळवता आला. पराभूत संघाच्या कार्तिकी फडतरे आणि आरती मेमाने यांचा सुरेख खेळ विजय मिळविण्यास अपुरा पडला.

तत्पूर्वी किशोर गटात उपांत्य फेरीत भैरवनाथ संघाने बाहेरच्या श्रीकृष्ण संघाचा पराभव केला तर वाघेश्वर संघाने जैन संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

See also  भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याचाआयसीसीचा विचार