बाणेर :
बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे प्रभाग क्र. ९ मधील ज्येष्ठ शिवसैनिक डाॅ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या सन. २०२२ मधील दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दिनदर्शिकेची माहिती देताना डॉ दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन जीवनात दिनदर्शिकेला फार महत्व आहे. म्हणून प्रभागातील नागरिकांना दिनदर्शिकेतील सर्व सविस्तर माहिती मिळावी या हेतूने शिवसेनेच्या वतीने सर्व नागरिकांसाठी शिवसेनेची दिनदर्शिका तयार केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, विधातेवस्ती परिसरात या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, विनोद चाकणकर, निहाल सायकर, शिवसैनिक संतोष भोसले शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.