बाणेर :
बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे परिसरातील सफाई कर्मचारी महिला तसेच परिसरातील इतर ग्रामस्थ महिलांना ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्यातर्फे मकर संक्रांत व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून साडी वाटप करण्यात आले यावेळी एकूण 300 महिलांना हे साडी वाटप करण्यात आले.







या कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिवसैनिक ॲड. लीना मुरकुटे म्हणाल्या की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी महिलांचा आदर करणे ही शिकवण दिली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच मकरसंक्रातिचे औचित्य साधून महिलांना साडी वाटपा करण्यात आले. त्याच बरोबरच भविष्यकाळात शिवसेनेच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याचे काम करणार आहे.
यावेळी राम गायकवाड, शशिकांत दर्शने, मेहबूब शेख, राहुल शिंदे, जयश्री मुरकुटे, कमल दर्शने, युगंधरा मुरकुटे, ॲड. लीना मुरकुटे, कल्पना इजगज, संगीता पाटील, मंजू वर्मा, श्वेता वाघ, सोनाली भोसले, द्रौपदी मोरे, प्रमिला गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, राणी लोंढे, चंद्रकला कुरे, नंदा पवार, किरण वर्मा, राणी झिरपे, रोहिणी गरड, सोनाली मेढे, अशा गंधे , पुष्पा गंधे, संतोष भोसले
तसेच परिसरातील शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.








