सुतारवाडी :
सुतारवाडी येथील रामेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सुतार तसेच स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या वतीने आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळची महाआरती उद्योजक समीर पाटील आणि सौ. पाटील यांच्या शुभहस्ते झाली.







महाशिवरात्री महोत्सवांमध्ये शिवलीलामृत पारायण तसेच सार्वजनिक अभिषेक करण्यात आला. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त हभप उमेश महाराज दशरथे (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजीत करण्यात आले होते. कीर्तनाला नामांकित मृदंगवादक व गायकवृंद यांची साथ लाभली. तर पाषाण, सोमेश्वरवाडी, वाकड, म्हाळुंगे, बालेवाडी, बाणेर, सुस, हिंजवडी, मान, बावधन बु. बावधन खुर्द, चांदे, नांदे, भूगाव, भुकुम, औंध, सांगवी, कोथरुड परिसरातील भजनी मंडळ उपस्थित होते.
या कार्यक्रमाची माहिती देताना स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी आपल्या परिसरामध्ये सांप्रदायिक त्याला फार मोठे महत्त्व असून विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात एकत्रितरीत्या सर्वजण साजरे करत असतो. कोरोना चे प्रमाण कमी झाल्यामुळे यावर्षीची महाशिवरात्र अतिशय उत्साहात साजरी करत आहोत.
यावेळी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण करणारे मृदुंगाचार्य पांडुरंग आप्पा दातार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महादेवाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या परिसरातील विणेकरी हभप बबन भेगडे, हभप कृष्णाजी भोते सामाजिक कार्यकर्ते नामदेव नलावडे यांचा देखील वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, संतसेवक मारूती कोकाटे, मृदुंगाचार्य उद्धव गोळे, हभप विठ्ठल सुतार, हभप विनोद खेडेकर, हभप बाळासाहेब सुतार, हभप अंकुश रणपिसे, उद्योजक अंबादास कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संपुर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन अखिल सुतारवाडी तरुण मंडळ, जय मल्हार तालिम संघ, समस्त सुतार रणपिसे भजनी मंडळ, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी ग्रामस्थ यांनी पाहिले.








