स्वीकृत सदस्य शिवम सुतार यांच्यावतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

0
slider_4552

पाषाण :

युवा नेते स्वीकृत सदस्य शिवम सुतार आणि सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, संजय गांधी वसाहत आणि बावधन परिसरातील ५० अनाथा गरीब गरजू महिलांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा  पाटील यांच्या शुभहस्ते संत तुकाराम मंगल कार्यालय पाषाण येथे मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार म्हणाले की, अनाथा गरजू महिलांना तसेच इतर गरजू महिलांना रोजगार मिळावा या हेतूने मोफत शिलाई मशीनचे वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून करत आहे. विधवा असणाऱ्या अनाथा गरजू महिला या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहून त्यांना आपले कुटुंब स्वतः चालविता आले पाहिजे. आपल्या गरजा भागवता आला पाहिजे. म्हणून त्यांना मोफत शिलाई मशीन वाटप केले आहे. यासोबतच परिसरातील गरजू हजार महिलांना शिवणकाम आणि ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. जेणे करुन प्रभाग क्रमांक १४ मधील प्रत्येक महीला सक्षम होवून खंबीर पणे उभी राहील.

या वेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात लोकांना आधार द्यायचे काम शिवम सुतार आणि आबा सुतार यांनी केले. सेवा हेच संघटन हा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्याचे अनुकरण करत शिवम सुतार यांनी महिलांना स्वतच्या पायावर उभे राहून सक्षम बनविण्याचे काम केले आहे. घरातील महिलेला आपले कुटुंब चालविण्या करिता शिलाई मशिन मोफत दिली. महिलांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. आबासाहेब सुतार यांनी आजपर्यंत सामाजिक कामात वाहुन घेतले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवम सामाजिक काम करत आहे. विविध योजना नागरिकांसाठी राबवत आहे. भविष्यात असेच काम करून सामजिक बांधिलकी जपण्याचे काम शिवम करेल असा विश्वास वाटतो.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते आबा सुतार, स्विकृत नगरसेवक शिवम सुतार, उद्योजक समीर पाटील, भाजपा कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, स्वरदा फाउंडेशन अध्यक्ष स्वाती मोहोळ, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग अप्पा दातार, संतसेवक मारूती कोकाटे, मृदुंगाचार्य उद्धव गोळे, हभप बाळासाहेब सुतार, हभप विठ्ठल चि सुतार, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सुतार, गोरख सुतार, हभप नितिन निम्हण, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कोकाटे, अंकुश रणपिसे, सुभाष रणपिसे, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, गोरख दगडे, भाजपा युवा मोर्चा मुळशी कार्याध्यक्ष सागर मारणे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, रोहन कोकाटे, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, सचिन दळवी, हभप विठ्ठल य सुतार, बबन सुतार, नामदेव नलावडे, हभप बबन भेगडे, ज्ञानेश्वर भेगडे, काळूराम रणपिसे, तसेच परिसरामधील अनाथा गरीब महिला आणि प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

See also  बाणेर ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान उत्सव कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द.... 

यावेळी मोफत 1000 गरजु महिलांना शिवण काम प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर 250 महिलांना ब्युटी पार्लर कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी शिवम सुतार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नाव नोंदणी केली जाईल. या कार्यक्रमाच्या वेळी नांदे गावच्या नवनिर्वाचित सरपंच निकिता रानवडे यांचा सत्कार स्विकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने आमदार चंद्रकात दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.