पुढील वर्षी २०२३ मध्ये बीसीसीआय महिलांची इंडियन प्रीमियर लिग घेण्याच्या विचारात…

0
slider_4552

मुंबई :

महिला आयपीएल स्पर्धेबाबत एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महिलांची इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) स्पर्धा घेण्याचा विचार करत आहे.

तसेच या स्पर्धेत एकूण ६ संघ असतील असे नियोजन बीसीसीआय (BCCI) करत आहे.

शुक्रवारी (२५ मार्च) रोजी मुंबईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) गव्हर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. यामध्ये महिला आयपीएलबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने सध्या प्रस्तापित असलेल्या पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील विविध फ्रँचायझी यांनाच महिला संघांबाबतही विचारणा करण्यात येणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिलांचे आयपीएल सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”

तसच आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हेदेखील म्हणाले की, “महिला आयपीएल सुरू करण्याच्या प्रकियेस प्रारंभ झाला आहे. या हंगामात ५-६ संघ सहभागी होऊ शकतात. यावर्षी मात्र महिला आयपीएलमध्ये केवळ ४ सामने खेळवले जातील. या सामन्यांचे आयोजन पुरुषांच्या आयपीएलमधील प्लेऑफ सामन्यांदरम्यान केले जाईल. यंदाच्या महिला टी२० चॅलेंजर अर्थात महिला आयपीएलमध्ये ३ संघ सहभागी होईल. हे सर्व सामने पुणे येथे होण्याची शक्यता आहे.”

दरम्यान महिला टी२० चॅलेंजरमध्ये ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी हे संघ खेळतात. सुपरनोवाज संघाने २०१८ आणि २०१९ मध्ये विजेतेपद पटाकवले होते. तर २०२० मध्ये ट्रेलब्लेजर्स संघ पहिल्यांदा विजेता बनला होता. २०२१ मध्ये कोरोनामुळे महिली टी२० चॅलेंजरचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा ही लीग खेळवली जाईल.

See also  प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमाला आजपासून सुरूवात