सुसगाव :
सुसगाव येथे श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सव निमित्त शनिवार दि. २३/०४/२०२२ रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थांनी केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या वेताळ शेळके याने गुणांवर विजय मिळवत “श्री काळभैरवनाथ मानाची गदा” पटकावली. विजेत्यास बक्षिस म्हणून उद्योजक नानासाहेब ससार यांजकडून रोख रक्कम १,५०००० रू आणि कै. हनुमंत सुतार यांच्या स्मरणार्थ गणेश हनुमंत सुतार यांजकडून चांदीची गदा देण्यात आली.







अंतिम सामन्यात सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुळशी चा मुन्ना झिंझुरके यांच्यात झाली. त्यामध्ये चपळ हालचालींनी वेताळ शेळके याने गुणांवर मुन्ना झिंझुरके याला पराभूत केले.
अतीशय सुंदर नियोजन करत आयोजन कमिटीने उपस्थितांचे मन जिंकले. या स्पर्धेसाठी सुस गावाचे सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा चिमाजी चांदेरे आणि बाळासाहेब चिमाजी चांदेरे यांनी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. विविध वजन गटात खेळवल्या गेलेल्या हि स्पर्धा अतीशय चुरशीने खेळली गेली. या स्पर्धेत विविध वजन गटात विजेत्या स्पर्धकांना बक्षीस रक्कम देण्यात आलीच शिवाय पराभूत झालेल्या खेळाडू ला देखील मानधन देण्यात आले.
दोन दिवस श्री भैरवनाथ यात्रेचे विविध धार्मिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कुस्त्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धे निमित्ताने राज्यातील नामवंत पैलवान तसेच सामाजिक, राजकीय मान्यवर उपस्थित होते. श्री भैरवनाथ उत्सव कमिटीच्या व ग्रामस्थांच्यावतीने नामदेव चांदेरे, सुहास भोते, नितीन चांदेरे, गणेश सुतार, नेताजी गांडेकर यांनी सुरेख आयोजन केले. तर आखाड्यातील नियोजन पै. जयसिंग चांदेरे, सुधीर सुतार, पै. शंतनु बांदल, पै. सुशील चांदेरे यांनी पाहिले.









