आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या दिपक पूनियाला रौप्य पदक

0
slider_4552

उलानबटार (मंगोलिया) –

भारताच्या दिपक पूनियाला कझाकस्तानच्या अझ्मत दौलेटबेकोवचा तगडा बचाव भेदता आला नाही आणि त्याला आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अन्य एका लढती भारताच्या विकी चहर याला ९२ किलो वजनी गटात ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दिपक पूनियाला सुवर्णपदकाची प्रतिक्षा होती. त्याने ८६ किलो वजन गटातून अंतिम फेरीही गाठली. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याने एकही गुण गमावला नाही. त्याने मोहसेन मिरीयुसेफ मोस्ताफवी अॅलनजाघ याला ६-० आणि कोरियाच्या ग्वांक किम याला ५-० असे पराभूत केले.

अंतिम फेरीत मात्र, दिपकला दौलेतबेकोवचा बचाव भेदता आला नाही. दिपकची आक्रमकता यासाठी पुरी पडली नाही. आपल्या वेगवान कुस्तीने खरे तर दिपक प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखायचा. मात्र, दौलेटबेकोव याने सुरक्षित अंतर ठेवत दिपकच्या पायावर लक्ष्य केले आणि ६-१ अशा गुणाने त्याने दिपकवर मात केली.

दिपकचे आशियाई स्पर्धेतील हे चौथे पदक ठरले. तो २०२१ मध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यापूर्वी २०१९ आणि २०२० मध्ये तो ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला होता.

त्यानंतर भारताची पदकसंख्या वाढवताना विकीने उझबेकिस्तानच्या अजिनियाज सापार्नियाझोव याचा ५-३ असा पराभव केला.

भारताने या स्पर्धेत रवी दहियाच्या सुवर्णपदकासह एकूण १७ पदके मिळविली. ग्रीको रोमन प्रकारात भारताने ५ ब्रॉंझपदके मिळविली. महिलांनी २ रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकांची कमाई केली.

दरम्यान फ्री-स्टाईल प्रकारात मंगल काडिया ६१ किलो आणि यश तुनिर ७४ किलो वजनी गटात पात्रता फेरीतच हरले. अनिरुद्ध कुमार १२५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व पेरीत कोरियाच्या येह्युन जुंगकडून पराभूत झाला.

See also  भारताचा बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग पाचवे पदक पक्के