४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कुमार गटात कोल्हापूर जिल्हा तर कुमारी गटात पालघर जिल्हा अजिंक्य..

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने युवानेते पार्थ पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कुमार गटात कोल्हापूर जिल्हा तर कुमारी गटात पालघर जिल्हा संघाने अजिंक्यपद मिळविले.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुमारी गटात पुणे जिल्ह्याने मुंबई शहर संघाचा पराभव केला तर पालघर संघाने सांगली जिल्ह्याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कुमार गटात मुंबई उपनगर ने परभणी संघाचा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर संघाने पालघर संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

बक्षीस वितरण समारंभ सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे सर कार्यवाह आस्वाद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेला पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पदाधिकारी, पंच प्रमुख सुहास पाटील, राज्य पंच, पुणे जिल्हा पंच, चेतक स्पोर्ट्स क्लब, धर्मवीर कबड्डी संघ चे खेळाडू उपस्थित होते.

See also  ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी महिला संघाने पहिल्यांदाच मारली उपांत्यपूर्व फेरीत धडक