औंध कुस्ती आखाड्यात पै. माऊली जमदाडे ठरला विजयी.

0
slider_4552

औंध :

औंध गाव ग्रामदैवत श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त भव्य “भव्य. कुस्तांच्या आखाड्याचे” आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्याच्या अंतिम कुस्ती मध्ये पै. माऊली जमदाडे याने हरयाणाच्या अजय कुमार ला पराभुत करत विजय मिळवत मानाची गदा मिळवली.

विजेत्या पैलवान माऊली जमदाडेला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉ सागर बालवडकर यांच्या वतीने रोख रक्कम एक लाख रूपये आणि कै. हनुमंत दत्तोबा रानवडे यांच्या स्मरणार्थ विरेंद्र हनुमंत रानवडे यांच्या तर्फे चांदीची गदा देण्यात आली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती मध्ये विजयी झालेल्या पैलवान विक्रम पारखी याला उद्योजक सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या वतीने रोख रक्कम ५१ हजार रूपये बक्षीस म्हणून देण्यात आली. तिसऱ्या कुस्ती साठी सामाजिक कार्यकर्ते नाना वाळके यांजकडून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये तर संतोष ज्ञानोबा गायकवाड यांच्या कडून चांदीची गदा देण्यात आली.

या स्पर्धेला पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली. तसेच या कुस्ती आखाडा यशस्वी आयोजन करण्यात औंध गाव कुस्ती केंद्राचे अध्यक्ष पैलवान विकास रानवडे, विराज रानवडे, आणि औंध मधील पैलवानांचे सहकार्य लाभले. आखाड्याचे आयोजन औंध गाव विश्वस्त मंडळ, आणि ग्रामस्थ मिळुन केले. स्पर्धेला सामाजिक, राजकीय, सांप्रदायिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दाखवली.

औंध गाव ग्रामदैवत श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त औंध विश्वस्त मंडळ अध्यक्ष : योगेश बाबासाहेब जुनवणे, सेक्रेटरी: गिरीश आत्माराम जुनवणे, खजिनदार: हेरंब शरद कलापुरे, विश्वस्त : राहुल प्रकाश गायकवाड,      महेंद्र किसन जुनवणे, विकास वसंतराव गायकवाड,  सागर बाळकृष्ण गायकवाड, सुप्रिम सुरेश चोंधे, विलास दत्तात्रय रानवडे, सुशील सुरेश लोणकर, सोपान गोपीनाथ राऊत,सल्लागार : गणेश दत्तात्रय कलापुरे, राहुल दिलीप गायकवाड, आनंद विनायक जुनवणे, सचिन विष्णुपंत रानवडे, रणजित सूर्यकांत कलापुरे, सुनिल दत्तात्रय गायकवाड, सोमनाथ दत्तात्रय बोर्डे, आणि औंधगाव ग्रामस्थांकडून औंधगाव ग्रामदैवत श्री नवखंडे भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त दि.१५.०५.२०२२ ते १९.०५.२०२२ रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

See also  निवृत्त पोलिस संघटना व एन्जॉय ग्रुपच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कुमार साळुंखे यांचा सत्कार..